‘सुंदर अलिबाग’ केवळ घोषणेतच? वास्तव मात्र विद्रूप
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ अशी घोषणा देणाऱ्या अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात सध्या ठिकठिकाणी विद्रुपीकरणाचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. शहरातील वाढता बकालपणा आणि
**अलिबागच्या विद्रुपीकरणावरून प्रशासनावर ताशेरे; ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे यांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र**  ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ अशी घोषणा देणाऱ्या अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात सध्या ठिकठिकाणी विद्रुपीकरणाचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. शहरातील वाढता बकालपणा आणि अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार अमर म. वार्डे यांनी अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून कडक कारवाईची मागणी केली आहे.  शहरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बालाजीनाका परिसरात बँक ऑफ इंडियाच्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरू आहे. या कामासाठी इमारतीला रस्त्याच्या कडेला बांबू लावून निळ्या ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. मात्र, या ताडपत्रीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून तिच्या चिंध्या झालेल्या दिसतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याचे वार्डे यांनी पत्रात नमूद केले आहे.  पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या अलिबागमध्ये व्हीआयपी संस्कृतीचा प्रभाव वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. विविध मान्यवरांच्या स्वागतासाठी जागोजागी कमानी आणि मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावण्यात आले असून, काही होर्डिंग्ज रस्त्याच्या वळणावर अशा पद्धतीने उभारण्यात आली आहेत की, वाहनचालकांना समोरील वाहतूक दिसणे कठीण होते. तसेच, विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या छोट्या जाहिरातींमुळे शहराचे सौंदर्य विद्रूप होत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. या जाहिरातींमधून नगरपरिषदेला उत्पन्न मिळते की नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.  याशिवाय, शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. काही स्वयंसेवी उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात असली, तरी नगरपरिषदेच्या स्तरावर ठोस उपाययोजना का होत नाहीत, असा प्रश्न वार्डे यांनी उपस्थित केला आहे. शहरातील अनेक बहुमजली इमारतींना बाहेरील रंगकाम न केल्यामुळे परिसर उदासवाणा दिसत असून, दिवसाही अंधार जाणवतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.  राज्यात विद्रुपीकरणाविरोधात कडक कायदे अस्तित्वात असताना त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून अलिबागचे सौंदर्य पुनर्स्थापित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर आता नगरपरिषद प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे अलिबागकरांचे लक्ष लागले आहे.


रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ अशी घोषणा देणाऱ्या अलिबाग नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात सध्या ठिकठिकाणी विद्रुपीकरणाचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. शहरातील वाढता बकालपणा आणि अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार अमर म. वार्डे यांनी अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून कडक कारवाईची मागणी केली आहे.

शहरातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बालाजीनाका परिसरात बँक ऑफ इंडियाच्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरू आहे. या कामासाठी इमारतीला रस्त्याच्या कडेला बांबू लावून निळ्या ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. मात्र, या ताडपत्रीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून तिच्या चिंध्या झालेल्या दिसतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याचे वार्डे यांनी पत्रात नमूद केले आहे.

पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या अलिबागमध्ये व्हीआयपी संस्कृतीचा प्रभाव वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. विविध मान्यवरांच्या स्वागतासाठी जागोजागी कमानी आणि मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावण्यात आले असून, काही होर्डिंग्ज रस्त्याच्या वळणावर अशा पद्धतीने उभारण्यात आली आहेत की, वाहनचालकांना समोरील वाहतूक दिसणे कठीण होते. तसेच, विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या छोट्या जाहिरातींमुळे शहराचे सौंदर्य विद्रूप होत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. या जाहिरातींमधून नगरपरिषदेला उत्पन्न मिळते की नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

याशिवाय, शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. काही स्वयंसेवी उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात असली, तरी नगरपरिषदेच्या स्तरावर ठोस उपाययोजना का होत नाहीत, असा प्रश्न वार्डे यांनी उपस्थित केला आहे. शहरातील अनेक बहुमजली इमारतींना बाहेरील रंगकाम न केल्यामुळे परिसर उदासवाणा दिसत असून, दिवसाही अंधार जाणवतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात विद्रुपीकरणाविरोधात कडक कायदे अस्तित्वात असताना त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून अलिबागचे सौंदर्य पुनर्स्थापित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर आता नगरपरिषद प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे अलिबागकरांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande