बीडच्या ऋषीकेश लाहोटींनी केली सीएफए इन्स्टिट्यूटची अंतिम परीक्षा उत्तीर्ण
बीड, 11 एप्रिल (हिं.स.) :बीड येथील विजय इंडस्ट्रीजचे संचालक सत्यनारायण लाहोटी यांचे नातू ऋषीकेश विजयकुमार लाहोटी यांनी अमेरिकेतील नामांकित सीएफए इन्स्टिट्यूटची अंतिम परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुंतवणूक आणि वित्त क्
बीडच्या ऋषीकेश लाहोटींनी केली सीएफए इन्स्टिट्यूटची अंतिम परीक्षा उत्तीर्ण


बीड, 11 एप्रिल (हिं.स.) :बीड येथील विजय इंडस्ट्रीजचे संचालक सत्यनारायण लाहोटी यांचे नातू ऋषीकेश विजयकुमार लाहोटी यांनी अमेरिकेतील नामांकित सीएफए इन्स्टिट्यूटची अंतिम परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

गुंतवणूक आणि वित्त क्षेत्रातील जगातील सर्वोच्च मानली जाणारी ही पदवी मिळवणाऱ्या ऋषीकेश लाहोटी यांनी बीड जिल्ह्यातील मोजक्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. पुण्यात वास्तव्यास राहून त्यांनी अत्यंत कठीण मानली जाणारी ही परीक्षा पूर्ण तयारीनिशी उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. सीएफए इन्स्टिट्यूट (यूएसए) ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य संस्था असून ती गुंतवणूक व्यावसायिकांना उच्च दर्जाचे वित्त शिक्षण प्रदान करते. नैतिक मूल्ये आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा आग्रह धरणारी ही संस्था जागतिक वित्त क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते.

ऋषीकेश लाहोटी यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे फलित असून, भविष्यात या ज्ञानाचा उपयोग समाज व भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी करण्याचा त्यांचा संकल्प आहे.या यशाबद्दल विजय इंडस्ट्रीजच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande