मध्य रेल्वेच्या मुंबई ते हावडा दरम्यान २ अतिरिक्त विशेष सेवा
मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) - प्रवाशांची उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हावडा दरम्यान २ अतिरिक्त विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. तपशील पुढीलप्रमाणे: 01145 लोकमान्य टिळक टर्मिनस– हावडा
मध्य रेल्वेच्या मुंबई ते हावडा दरम्यान २ अतिरिक्त विशेष सेवा


मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) - प्रवाशांची उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हावडा दरम्यान २ अतिरिक्त विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत.

तपशील पुढीलप्रमाणे:

01145 लोकमान्य टिळक टर्मिनस– हावडा विशेष दि. १४.०४.२०२६ रोजी रात्री २०.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०६.०० वाजता पोहोचेल.

01146 हावडा – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. १६.०४.२०२६ रोजी १४.४५ वाजता हावडा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपूर आणि संतरागाछी.

संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ९ वातानुकूलित तृतीय, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 01145 साठीचे आरक्षण १२.०४.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande