
मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार व मंगळवार दिनांक १३ आणि १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री मध्य रेल्वेकडून ४ विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येणार आहेत.
तपशील पुढीलप्रमाणे :
मुख्य मार्ग
उपनगरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल व कल्याण येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
उपनगरी विशेष गाडी कल्याण येथून ०१.३० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
हार्बर मार्ग
उपनगरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल व पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
उपनगरी विशेष गाडी पनवेल येथून ०१.३० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
मंगळवार दिनांक १४.०४.२०२६ रोजी उपनगरी सेवा नेहमीप्रमाणे (नियमित वेळापत्रकानुसार) चालतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी