चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
चंद्रपूर, 11 एप्रिल (हिं.स.) : मराठवाड्यात आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसल्यानंतर दुपारी 4.22 मिनीटांनी विदर्भातील चंद्रपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदविण्यात आली. जिल्ह्यात शनिवारी साय
भूकंप लोगो


चंद्रपूर, 11 एप्रिल (हिं.स.) : मराठवाड्यात आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसल्यानंतर दुपारी 4.22 मिनीटांनी विदर्भातील चंद्रपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदविण्यात आली. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे स्थानांक अक्षांश १९.७४२ उत्तर व रेखांश ७९.२४० पूर्व असून, तो जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर निर्माण झाला. तेलंगणातील हरदोलाहे भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची कोरपना तालुक्यातील गडचांदूर या ठिकाणी रिक्टर स्केलवर तीव्रता ३.४ इतकी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande