एक मेपासून जनगणना कामाला सुरुवात; पूर्वतयारीला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : येत्या १ मेपासून जनगणनेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून त्यासाठीची सर्व पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत. जनगणना कामाच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत ते
एक मेपासून जनगणना कामाला सुरुवात; पूर्वतयारीला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : येत्या १ मेपासून जनगणनेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून त्यासाठीची सर्व पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत.

जनगणना कामाच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे तसेच जनगणना जिल्हा समन्वयक पवन गोडे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि नगरपालिका मुख्याधिकारीही सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, निरीक्षक, समन्वयक आणि प्रगणक यांचे प्रशिक्षण, तसेच ऑनलाईन पोर्टलवरील नोंदणीचे काम प्राधान्याने पूर्ण केले पाहिजे. निवडणुकीप्रमाणेच जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे आणि कालबद्ध काम असल्याने सर्व यंत्रणांनी त्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण प्रक्रियेची पूर्ण माहिती घेऊन पोर्टलवर अचूक नोंदी कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या तयारीमुळे जनगणना काम सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande