बीडमध्ये अखंड त्रिदिवशीय हरिनाम सोहळा
बीड, 11 एप्रिल (हिं.स.)। बीड येथील श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान इंद्रप्रस्थ कॉलनी नगररोड बीड येथे याहीवर्षी संत वामनभाऊ, संत भगवानबाबा, संत तुकाराम, विठ्ठल-रूक्मिणि, हनुमान देवता मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित
बीडमध्ये अखंड त्रिदिवशीय हरिनाम सोहळा


बीड, 11 एप्रिल (हिं.स.)। बीड येथील श्रीसंत भगवानबाबा व श्रीसंत वामनभाऊ प्रतिष्ठान इंद्रप्रस्थ कॉलनी नगररोड बीड येथे याहीवर्षी संत वामनभाऊ, संत भगवानबाबा, संत तुकाराम, विठ्ठल-रूक्मिणि, हनुमान देवता मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१९ ते २१ या कालावधीमध्ये त्रिदिवशीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा, ६ ते ७ विष्णु सहस्रनाम, ७ ते १० पुजा अभिषेक आरती, ११ ते १ गाथाभजन, १ ते २ भोजन,३ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. दि.१९ एप्रिल रविवार रोजी ह.भ.प वैजीनाथ महाराज सानप व ह.भ.प रामहरी रसाळसर यांचे प्रवचन व रात्री ह.भ.प डॉ. विक्रम महाराज सारूक यांचे हरिकिर्तन होईल. दि.२० एप्रिल सोमवार रोजी ह.भ.प अंगद महाराज मोरे व ह.भ.प कचरू महाराज चव्हाण यांचे प्रवचन व रात्री ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली मझरीकर यांचे हरिकिर्तन होईल. दि.२१ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प पांडुरंग महाराज

गुरु रामदास महाराज (महंत डोंगरेश्वर संस्थान करंजवन) महाराज यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल. नंतर महाप्रसादाची पंगत होईल. बीड शहरातील परीसरातील भाविक भक्तांनी या त्रिदिवशीय हरिनाम सोहळ्यास उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक व श्री. संत भगवानबाबा व श्री. संत वामनभाऊ प्रतिष्ठान इंद्रप्रस्थ कॉलनीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र सानप व प्रतिष्ठानचे सर्व सहकारी व इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरातील भाविक भक्त यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande