सोलापूर महापालिकेची धडक मोहीम; दोन दिवसांत ५४२ नोंदणीबाह्य मिळकतींचा शोध
सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : सोलापूर शहरातील महापालिकेच्या नोंदीबाहेर राहिलेल्या मिळकती शोधण्यासाठी राबविण्यात येत असलेली विशेष मोहीम वेगाने सुरू असून, अवघ्या दोन दिवसांत तब्बल ५४२ नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या कर विभा
सोलापूर महापालिकेची धडक मोहीम; दोन दिवसांत ५४२ नोंदणीबाह्य मिळकतींचा शोध


सोलापूर, ११ एप्रिल (हिं.स.) : सोलापूर शहरातील महापालिकेच्या नोंदीबाहेर राहिलेल्या मिळकती शोधण्यासाठी राबविण्यात येत असलेली विशेष मोहीम वेगाने सुरू असून, अवघ्या दोन दिवसांत तब्बल ५४२ नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या कर विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने अनधिकृत अथवा नोंद नसलेल्या घरांचा आणि व्यावसायिक मिळकतींचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध प्रभागांमध्ये पथकांकडून प्रत्यक्ष पाहणी, नोंदींची पडताळणी आणि मालमत्ता कर अभिलेखांची तपासणी केली जात आहे.

या मोहिमेदरम्यान २०० हून अधिक नोंदणी नसलेली घरे आणि मिळकती उघडकीस आल्याने कर आकारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मोहिमेत कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून १८ कर्मचाऱ्यांना उपायुक्तांकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कामचुकारपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे आतापर्यंत लपून राहिलेल्या मिळकती करजाळ्यात येणार असून, शहराच्या आर्थिक बळकटीस मोठा हातभार लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande