पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची फेसबुक पोस्ट लिहीत आत्महत्या; मृत्यूपूर्वी मांडली व्यथा
बीड, 11 एप्रिल (हिं.स.)। परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून शेतात आधी विषारी औषध प्राशन करून आणि नंतर गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी रामेश्वरने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिह
पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची फेसबुक पोस्ट लिहीत आत्महत्या; मृत्यूपूर्वी मांडली व्यथा


बीड, 11 एप्रिल (हिं.स.)।

परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून शेतात आधी विषारी औषध प्राशन करून आणि नंतर गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी रामेश्वरने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या मनातील वेदनांना वाट करून दिली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

रामेश्वरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पत्नी हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पत्नीकडून होणारा मानसिक छळ, वारंवार होणारी मारहाण आणि प्रकृतीच्या बाबतीत केली जाणारी फसवणूक यामुळे आपण हताश होऊन हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले. पत्नीकडून संपत्तीसाठी दबाव टाकला जात असून खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा दावाही त्याने केला होता. फेसबुक पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपवले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande