
सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवाराच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा विवाह सोहळा दि. ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता जामुंडे मंगल कार्यालय, जुने सोलापूर येथे संपन्न होणार आहे. विविध धर्मीय वधू-वरांना एकत्र आणून साध्या व सामूहिक पद्धतीने विवाह लावण्याचा या सोहळ्याचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी नाव नोंदणी सुरू असून इच्छुकांनी २५ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी विशाल पाटील, उमेश कोळेकर, राम वाकसे, अमर दुगाळ आणि रोहित तडवळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड