कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात मकोका दाखल करावा - धर्मवीर आध्यात्मिक सेनेची मागणी
नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.)। नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्रासह देशात खळबळ निर्माण झालेली आहे. आरोपींनी केलेली कृत्ये ही अतिशय हीन व किळसवाणी असून मानवतेला काळिमा फासणारी आहेत. या प्रकरणात आरोपींना
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात मकोका दाखल करावा - धर्मवीर आध्यात्मिक सेनेची मागणी


नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.)।

नाशिकमधील मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्रासह देशात खळबळ निर्माण झालेली आहे. आरोपींनी केलेली कृत्ये ही अतिशय हीन व किळसवाणी असून मानवतेला काळिमा फासणारी आहेत. या प्रकरणात आरोपींना मकोका दाखल करावा अशी मागणी धर्मवीर आध्यात्मिक सेनेची पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे मागणी केली आहे.

सदर गुन्हा हा अतिशय पूर्वनियोजित व प्रोत्साहित पद्धतीने करण्यात आलेला आहे. तसेच, हा गुन्हा करण्यासाठी आरोपींना प्रोत्साहित करण्यामागे बाह्य घटकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पडद्यामागून आरोपींना आर्थिक तसेच इतर रसद पुरवत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा हा संघटितपणे करण्यात आलेला असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित आरोपींच्या कृत्यांबाबत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत योग्य ती कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख ॲड अक्षय कलंत्री, राज्य उपाध्यक्ष मयुर थेटे, द्वारकानाथ मोकाट, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande