
बीड, 11 एप्रिल (हिं.स.)। भाजपचे आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडच्या जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वेगळं वळण मिळत असल्याचं चित्र आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यासंबंधी एक दावा केला होता. त्या दाव्याला धनंजय देशमुखांनी बळकटी देणारं वक्तव्य केले. संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आलं होतं, असा दावा धनंजय देशमुखांनी केला. भाजप आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. मस्साजोग गावात होणाऱ्या चोऱ्या घरफोडी आणि विविध विषयांवर पोलीस अधीक्षक कार्यालयात तासभर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी त्यांच्यावरील असलेल्या गुन्ह्यातून सोडण्यासाठी सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची केस मागे घेण्यासंदर्भात समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता. याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला.
धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी मला एका जागेवर बोलावून घेण्याचं षडयंत्र होतं. त्यातील एका साक्षीदाराने बोलावून घेऊन हे प्रकरण मिटवू असे म्हटलं. मात्र त्यांनी ज्या ठिकाणी बोलावलं तिथे मी गेलो नाही.
------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis