महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक - अशोक सोनवणे
नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक समता, शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविणारे महात्मा जोतीराव फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन प्रा. अशोक सोनवणे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
Mahatma Jyotirao Phule


नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक समता, शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविणारे महात्मा जोतीराव फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन प्रा. अशोक सोनवणे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथील सामाजिक न्याय भवन येथे ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त “महात्मा फुले यांचे विचार व कार्य” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. श्री सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुण्यातील भिडे वाडा येथे १८४८ मध्ये सुरू केलेली पहिली मुलींची शाळा, तसेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी उचललेली ऐतिहासिक पावले यांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी ‘दिनबंधू’ वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेल्या लोकजागृतीचेही महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात समाज कल्याण विभाग, नाशिकचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, विशेष अधिकारी नवनाथ डोंगरे, सहाय्यक लेखाधिकारी पुनम बेंडकुळे, कार्यालय अधीक्षक मुकेश कानडे तसेच वसतिगृहातील विद्यार्थीनी व कर्मचारी उपस्थित होते.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande