
नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.)।
- राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज मुंबई नाका येथील फुले स्मारक येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, स्त्री शिक्षणाची पायाभरणी करून समाजातील वंचित व शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समतेचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असून, नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे.समाज परिवर्तनाच्या दिशेने महात्मा फुले यांनी दिलेली शिकवण ही आजच्या काळात अधिक महत्त्वाची असल्याचेही मंत्री महाजन यांनी नमूद केले.याप्रसंगी महापौर सौ. हिमगौरी आडके, माजी आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, लक्ष्मण सावजी, नगरसेविका जुई शिंदे, नगरसेविका चंद्रकांत खुडे, बापू पिंगळे, निलेश बोरा,संदिप जाधव, तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV