एनएसयुआयच्या वतीने महात्मा फुलेंची प्रेरणादायी विश्वविक्रमी पगडी साकार
नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.)। - काँग्रेस भवन येथे अनोख्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना 20 व्या जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यात आले. नाशिक जिल्हा एन एस यू आय च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांची 08 फूट बाय
NSUI creates inspiring world


नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.)।

- काँग्रेस भवन येथे अनोख्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना 20 व्या जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन करण्यात आले.

नाशिक जिल्हा एन एस यू आय च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांची 08 फूट बाय 05 फूट अशी भव्य विश्वविक्रमी पगडी तयार करून जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. नाशिक जिल्हा एन एस यु आयचे अध्यक्ष अल्तमश शेख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी ही पगडी साकार केली. 525 मीटर एवढा भव्य कपड्याची ही पगडी बनवण्यात आलेली आहे सदरची पगडी २१ फूट परिघामध्ये सामावलेली आहे सदरची पगडी नाशिक शहर काँग्रेस भवन येथे ठेवण्यात आली. याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त, नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड व अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सचिव व महाराष्ट्राच्या प्रभारी शांभवी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. सदर महात्मा ज्योतिबांची पगडी ही विक्रमिस्त आहेत, परंतु येणाऱ्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण आहे एन एस यु आय च्या पदाधिकाऱ्यांनी सदरची पगडी प्रत्येक महाविद्यालयात घेऊन जाऊन त्याचे महत्त्व पटवून द्यावे असे आवाहन नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सचिव प्रभारी शांभवी शुक्ला, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव ब्रिज किशोर दत्त, नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, यांनी आपले मनोगत व्यक्त करून एन एस यु आयच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande