
नाशिक, 11 एप्रिल (हिं.स.)।
– येथील नामांकित आय टी कंपनी टी.सी.एस.मध्ये महिलांचे लैंगिक शोषण,अत्याचार,ब्लॅकमेलींग, धर्मांतर व बळजबरीने मांसाहार खायला द्यायचे प्रकरण उघडकीस आले आहे.या प्रकरणात नाशिक महिला पोलीसांनी वेशांतर करून या ठिकाणी वास्तव्य केले.सर्व गैरप्रकार चालतात तेव्हा त्यांनी धाडसत्र सुरु केले व संबंधीत अत्याचार करणाऱ्यांना अटक केली.यात एका महिलेचाही समावेश होता.त्या महिलेला सुध्दा शिताफीने अटक केली आहे. वास्तविक महिला पोलीसांनी मोठे धाडस करुन हे काम केले व वेशांतर करून पोस्ट ऑपरेशन केले.जे अल्पसंख्यांक समाजाचे विशिष्ट जातीचे कर्मचारी या ठिकाणी गैरप्रकार करत होते. त्यांच्यातच राहून गुप्त पध्दतीने या महिला पोलीसांनी हे गौरवास्पद काम केले. त्यामुळे त्या सर्व महिला पोलीस अभिनंदनास पात्र आहेत असे भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार यांनी म्हटले आहे.
वास्तविक हा गैरप्रकार पुर्वीपासून सुरु होता.एका मुलीने येथील गैरप्रकाराबाबत या कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात ई मेल करून तक्रार केली होती.तरी सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले गेले व त्यामुळे असे चुकीचे गैरप्रकार वारंवार घडत गेले.तथापी यांची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्या पध्दतीने वेशांतर करून या प्रकारणाचा पर्दाफास केला.त्यामुळे त्या महिला पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. पोलीसांना सतत दोष देणाऱ्यांनी त्यांची दुसरी बाजुही पहावी व पोलीसांना सहकार्य करावे.पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. त्यांना सतत सहकार्य करत रहावे व त्यांना सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष सुनिल केदार यांनी व्यक्त केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV