पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडे एफआरपीचे १६१ कोटी थकीत
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)जिल्ह्यात मार्चअखेरीस सात कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची १६१ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. कर्मयोगी आणि भीमा पाटस या भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांची देणी मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. अन्
sugar


पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)जिल्ह्यात मार्चअखेरीस सात कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची १६१ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. कर्मयोगी आणि भीमा पाटस या भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांची देणी मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. अन्य पाच कारखान्यांकडील शेतकऱ्यांची देणी थोड्या प्रमाणात आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत असलेल्या छत्रपती आणि नीरा-भीमा कारखान्यांनी मात्र शंभर टक्के एफआरपी दिली आहे.

सरकारी अनास्थेमुळे साखरधंदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असल्याने सात कारखान्यांकडे थोडी-बहुत थकबाकी दिसून येत आहे. फेब्रुवारीत बंद झालेल्या पराग व दौंड शुगरची काही प्रमाणात देणी राहिली आहेत. माळेगाव, बारामती ॲग्रो व विघ्नहर या कारखान्यांचीही मार्चअखेरीस मोठी देणी राहिलेली साखर आयुक्तालयाच्या अहवालात दिसत आहेत.

जिल्ह्यात नेमके भाडेतत्त्वावर दिलेले कारखाने एफआरपीबाबत खूपच मागे आहेत. ओंकार ग्रुपने चालवायला घेतलेल्या कर्मयोगी कारखान्याने शेतकऱ्यांची तब्बल ७० कोटींची आणि साईप्रिया ग्रुपने चालवायला घेतलेल्या भीमा पाटसने २८ कोटींची देणी थकवल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande