अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)। अहमदपूर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्यशोधक चळवळीचे प्रणेते आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती मंचकरावजी पाटील सा
महात्मा ज्योतिबा फुले


लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)।

अहमदपूर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्यशोधक चळवळीचे प्रणेते आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती मंचकरावजी पाटील साहेब यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्राच्या मातीत पुरोगामी विचारांची बीजे रोवून सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून बहुजन समाजाला वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक विषमता व भेदभावावर आसूड ओढले असून त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी मुकुंदराव देशमुख, सचिव ओम उगिले, सहाय्यक सचिव राजेंद्र कासले, स्वामी यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande