पाटबंधारे विभागाची पुणे महापालिकेला पाणी कपात करण्याची सूचना
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल लागल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसा आड पाणी पुरवठा शहरात केल
water


पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल लागल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसा आड पाणी पुरवठा शहरात केला जावा यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर सादर केला आहे. त्यावर आता आयुक्त काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात एलनिनो या वादळाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविला जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवून खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा, भविष्यात आवश्यक असणारे पाणी आणि पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता याबद्दल माहिती दिली. त्यानुसार महापालिकेने १५ टक्के पाणी कपात करावी अशी सूचना दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande