पट्टीवडगाव येथे रेणुका देवी यात्रा महोत्सव
बीड, 11 एप्रिल (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील रेणुका देवीची चैत्रपालवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांचे दैवत असलेल्या रेणूका जगदंबा देवीची यात्रा महोत्सव चैत्र वद्य अष्टमीला प्रती वर्षाप्रमाणे आयोजित करण्यात ये
पट्टीवडगाव येथे रेणुका देवी यात्रा महोत्सव


बीड, 11 एप्रिल (हिं.स.)।अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील रेणुका देवीची चैत्रपालवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांचे दैवत असलेल्या रेणूका जगदंबा देवीची यात्रा महोत्सव चैत्र वद्य अष्टमीला प्रती वर्षाप्रमाणे आयोजित करण्यात येते. यंदाही यात्रोत्सव संपन्न होणार आहे.

परिसरातील भाविक भक्त वव्यापारी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. ग्राम दैवत व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी असते तर रात्री ७ वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते आरधी बँडवाले पताके, पोथी गोंधळी सहभागी होतात.घरोघरी रांगोळी काढून देवीच्यापालखीचे पूजन केले जाते. यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दुरदुरचे व परिरसातील पैलवान आपली उपस्थिती लावणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande