
सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुपर मार्केट येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच कॉन्सील हॉल येथील महापौर कार्यालयात असलेल्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेविका सारिका खजुरगी, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक विजय चिप्पा, महेश देवकर, संतोष कदम, तसेच सहायक आयुक्त (समाज कल्याण) सुलोचना सोनावणे आणि कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड