मतदार यादीत नाव हवे असेल तर १२ एप्रिलला 'SIR मॅपिंग' करून घेणे अनिवार्य - तहसीलदार उज्वला पांगरकर
लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील सर्व मतदारांना सूचित करण्यात येते की, तालुक्यातील सर्व विधानसभा मतदान केंद्रांवर येत्या रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ही प
तहसीलदार  आवाहन


लातूर, 11 एप्रिल (हिं.स.)।

अहमदपूर तालुक्यातील सर्व मतदारांना सूचित करण्यात येते की, तालुक्यातील सर्व विधानसभा मतदान केंद्रांवर येत्या रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सन २००२ च्या मतदार यादीनुसार 'SIR मॅपिंग' करण्यासाठी राबवली जात असून, संपूर्ण काम मोबाईल अॅपच्या माध्यमातून 'डिजीटल' पद्धतीने पार पडणार आहे. ज्या मतदारांकडे सन २००२ मधील त्यांच्या नावाची नोंद, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि यादी भाग क्रमांक उपलब्ध आहे, त्यांनी ती माहिती संबंधित बी.एल.ओ. (BLO) यांच्याकडे जमा करावी, जेणेकरून डिजिटल मॅपिंगची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होईल.

या मोहिमेच्या दिवशी सर्व बी.एल.ओ. आपापल्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. जे मतदार या विहित वेळेत आपले SIR मॅपिंग पूर्ण करून घेणार नाहीत, त्यांची नावे पुढील मतदार यादीत समाविष्ट होणार नाहीत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अहमदपूर मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने या मोहिमेत सहभागी होऊन आपले मॅपिंग काम पूर्ण करून घ्यावे, असे जाहीर आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande