मराठवाडा विद्यापीठात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य इमारतीसमोरील महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास कुलगुर
Q


छत्रपती संभाजीनगर, ११ एप्रिल (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मुख्य इमारतीसमोरील महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास कुलगुरू डॉ. विजय फुलारी, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे तसेच कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. वैशाली खापर्डे, डॉ. वीना हुंबे, संचालक डॉ. बी. एन. डोळे, डॉ. कैलास अंभुरे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. आनंद उबाळे, डॉ. सुनील नरवडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले.-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande