मुखेडमध्ये फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)। राष्ट्रनिर्माते, क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती व विश्वभुषण, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सवा निमित्त समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शहरवा
मुखेडमध्ये फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)।

राष्ट्रनिर्माते, क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती व विश्वभुषण, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सवा निमित्त समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शहरवासीयांना वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जन्मोत्सवानिमित्त शहरात दरवर्षी परिवर्तनावादी उपक्रम राबविले जातात. दि.१२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर स्मारकासमोर चवदार पाणपोईचे उद्घाटन तहसीलदार राजेश जाधव यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी एस.एम. ढवळे तर प्रमुख मान्यवर म्हणून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सुप्रसिध्द विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान डॉ. आंबेडकर स्मारकासमोर होणार आहे. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवता विचारमंचाचे प्रमुख बालाजी लिंगनवाड तर उद्घाटक इंजी. राजेद्र वाघमारे

व प्रा. उत्तमकुमार कांबळे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. दि. १३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता भव्य आतिषबाजी होईल. तर दि.१४ एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजता तक्षशिला महाबोधी महाविहार फुलेनगर येथे भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष गंगाधर सोंडारे बावलगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहन तर महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष शेख रियाज चांदपाशा करतील. सकाळी १० वाजता मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे मुख्य ध्वजारोहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता तक्षशीला महाबोधी महाविहार, फुलेनगर येथून महामानवांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे. सर्व प्रबोधनात्मक कार्यक्रमास मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने निमंत्रक अनिल बनसोडे व आशितोष कांबळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande