कर्जत तालुका बैलगाडी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान चंचे यांची बिनविरोध निवड
रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील बैलगाडी विश्वात मोठी घडामोड घडली असून, बैलगाडी संघटनेच्या नेतृत्वात अचानक मोठा बदल झाला आहे. कर्जत तालुका बैलगाडी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान चंचे, तर उपाध्यक्षपदी नरेंद्र गोमारे यांची बिनविरोध निवड झाल
बैलगाड


रायगड, 11 एप्रिल (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील बैलगाडी विश्वात मोठी घडामोड घडली असून, बैलगाडी संघटनेच्या नेतृत्वात अचानक मोठा बदल झाला आहे. कर्जत तालुका बैलगाडी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान चंचे, तर उपाध्यक्षपदी नरेंद्र गोमारे यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.

बैलगाडी शर्यती आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या संघटनेत झालेल्या या निवडीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनुभवी चेहरा म्हणून ओळख असलेल्या भगवान चंचे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या अनुभवामुळे संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, तरुण आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे नरेंद्र गोमारे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने संघटनेत नवे समीकरण तयार झाले आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेत नवचैतन्य येणार की संघर्ष वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडीनंतर संपूर्ण तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी, काही ठिकाणी दबक्या आवाजात नाराजीही व्यक्त होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात बैलगाडी शर्यतींचे नियोजन, नियम आणि संघटनेची भूमिका यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील बैलगाडी चळवळ कोणत्या दिशेने वाटचाल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande