रत्नागिरी : संचमान्यतेच्या अटीतून कोकणातील शाळा वगळण्याचा मुख्याध्यापक संघाचा ठराव
रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेच्या अटीतून कोकणातील शाळा वगळावे, असा ठराव मुख्याध्यापक संघाने केला आहे.राजापूर तालुक्यातील जैतापूर न्यू इंग्लिश स्कूल येथे मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र आणि आजी-माजी मुख्याध्या
रत्नागिरी : संचमान्यतेच्या अटीतून कोकणातील शाळा वगळण्याचा मुख्याध्यापक संघाचा ठराव


रत्नागिरी, 11 एप्रिल, (हिं. स.) : माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेच्या अटीतून कोकणातील शाळा वगळावे, असा ठराव मुख्याध्यापक संघाने केला आहे.राजापूर तालुक्यातील जैतापूर न्यू इंग्लिश स्कूल येथे मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र आणि आजी-माजी मुख्याध्यापक मेळावा पार पडला. त्यावेळी राजापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शैक्षणिक कृतीसत्रात हा ठराव करण्यात आला.

गेल्या १५ मार्चच्या शासननिर्णयाचा फटका कोकणातील १६ ते १८ टक्के कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कोकणातील शाळांना विशेष बाब म्हणून या निर्णयातून सूट मिळावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात शालेय प्रशासनातील पारदर्शकता आणि नवीन शासकीय निर्णयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी संचालक सुरेश पोवार आणि रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. यावेळी तालुका सचिव संजय मांडवकर यांनी संचमान्यतेबाबत जिल्हा संघासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande