
पुणे, 11 एप्रिल (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे प्रशासन आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन अशा एकत्रित प्रयत्नांमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल, ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळा राज्यासाठी एक 'रोल मॉडेल' प्रकल्प ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वास यांनी व्यक्त केला पुणे जिल्हा परिषदेतर्फे खानवडी येथील ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात मंत्री, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार रावल, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात भाषण करताना अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेत महिलांना ३० टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचा संदर्भ दिला. ते म्हणाले, महिलांना आरक्षण देणे ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली ठरेल. महिलांना सत्तेतही वाटा मिळाला पाहिजे. महिला उपमुख्यमंत्री झाल्या, मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिल्या आयुक्त झाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु