
कोल्हापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।कोल्हापुरात झालेल्या जितो प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्यामध्ये अन्वीत वॉरियर्स संघाने सिल्वो स्टाईल सिल्व्हर हॉक संघावर २३ धावांनी मात करत अजिंक्यपद पटकावले. विजेत्या वॉरियर्स संघाला १ लाख २० हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले.
जितो युथ विंगच्यावतीने जैन समाजातील खेळाडूंसाठी दर दोन वर्षांनी जितो प्रिमिअर लीग आयोजित केली जाते. यंदा शास्त्रीनगर मैदानावर शुक्रवारपासून तीन दिवस रंगलेल्या सामन्यात १० संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अंतिम फेरीत पोचलेल्या अन्वीत वॉरियर्स आणि सिल्वो स्टाईल सिल्व्हर हॉक संघादरम्यान विजेते पदासाठी लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना, अन्वीत वॉरियर्सने १० षटकात ५ बाद १२९ धावा केल्या. मात्र सिल्वो स्टाईल संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांनी चार गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावापर्यंत मजल मारली. विजेत्या अन्वीत वॉरियर्सला प्रतिक ओसवाल यांच्या हस्ते १ लाख २० हजार रूपये आणि चषक, तर उपविजेत्या सिल्वो स्टाईल संघाला ७० हजार रूपये आणि चषक देण्यात आला. जितोचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक संजय घोडावत, संस्थापक चेअरमन नेमचंद संघवी, जितो कोल्हौर चे चेअरमन रवी संघवी, जितो लीग चे मुख्य प्रायोजक अतिवा ज्वेलरी चे रीवा राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण झाले. अन्वीत संघाच्या राकेश कुरूंदवाडेला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. तर सौरभ धांदलेचा उत्कृष्ट फलंदाज आणि अविनाश मायगोंडाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरव झाला.
यावेळी कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष रवी संघवी, िगरीष शहा, अनिल पाटील, जितेंद्र राठोड, प्रकाश राठोड , हर्षल दलाल, जितो यूथ चे पुनित कोठारी, चिंतन राठोड, मेहुल जैन, जितो लेडीज़ विंग चे माया राठोड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar