आयपीएल 2026: पंचांशी वाद घालणे नितीशला पडले महागात, सामना शुल्काच्या २५% दंड आकारला
-सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला १२ लाख रुपयांचा दंड - स्लो ओव्हर रेटसाठी गायकवाडवर दंडात्मक कारवाई चेन्नई, 12 एप्रिल (हिं.स.)दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, दोन प्रमुख नावांना दंड ठोठावण्यात आला
नितीश राणा


-सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला १२ लाख रुपयांचा दंड

- स्लो ओव्हर रेटसाठी गायकवाडवर दंडात्मक कारवाई

चेन्नई, 12 एप्रिल (हिं.स.)दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, दोन प्रमुख नावांना दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नितीश राणा आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांनाही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे.

सामन्यादरम्यान सर्वात मोठा वाद दिल्लीच्या डावातील १९ व्या षटकात निर्माण झाला, जेव्हा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने घाम येत असल्यामुळे आपले ग्लोव्हज बदलण्याची परवानगी मागितली. चेन्नईच्या दमट उन्हात ही एक सामान्य विनंती होती, परंतु चौथ्या पंचांनी ती नाकारली. परिस्थिती चिघळली आणि स्टब्स बाद झाल्यानंतर लगेचच नितीश राणाने पंचांशी वाद घातला. आयपीएलने हे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन मानले आहे. आयपीएलच्या निवेदनानुसार, नितीश राणाला त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केले आहे, जे सामन्यादरम्यान आक्षेपार्ह भाषेच्या वापराशी संबंधित आहे. पण, राणाने आपली चूक कबूल केली आणि सामनाधिकाऱ्याचा निर्णय स्वीकारला.

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडवरही कारवाई झाली. त्याचा संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही, परिणामी त्याला १2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएलनुसार, हंगामातील हा संघाचा पहिलाच गुन्हा होता, त्यामुळे गायकवाडला १2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आयपीएलमध्ये षटकांचा संथ वेग ही एक गंभीर समस्या मानली जाते आणि वारंवार असे केल्यास अधिक कठोर शिक्षा होऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande