
-राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १६वर्षांखालील )-उत्सव आखाडे सामन्यात ९ बळी व मुजतबा सय्यद ८२ धावा यांची जोरदार कामगिरी
नाशिक, 14 एप्रिल (हिं.स.)महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), नाशिक विरुद्ध क्लब ऑफ महाराष्ट्र या , दोन दिवसीय कसोटी सामन्यात , नाशिकचा उत्सव आखाडे याने सामन्यात ९ व श्रेयस उगलेने ६ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तर मुजतबा सय्यदने ८२ व आयुष शहाणेने नाबाद ५८ अशा धावा करत फलंदाजीत प्रभावी कामगिरी करून मोठा विजय मिळवून दिला.
पुणे येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नाशिकने मुजतबा सय्यद ८२ व आयुष शहाणे नाबाद ५८ यांच्या फलंदाजीच्या जोरावर ८ बाद ३१० धावा केल्या. उत्तरादाखल उत्सव आखाडे पाच बळी व श्रेयस उगले तीन बळी यांनी क्लब ऑफ महाराष्ट्र , पुणेला पहिल्या डावात ११८ धावांत गुंडाळले. फॉलोऑन नंतर दुसर्या डावात देखील उत्सव आखाडेने चार व श्रेयस उगलेने तीन बळी घेतक्लब ऑफ महाराष्ट्रला दुसर्या डावात ही केवळ ९२ धावांतच सर्वबाद करत नाशिकला एक डाव व १०० धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV