आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची १४ पदकांची कमाई; सुजीत आणि अभिमन्यूला सुवर्णपदक
नवी दिल्ली, 12 एप्रिल, (हिं.स.) जागतिक अंडर-२३ चॅम्पियन सुजीत आणि अभिमन्यूने सीनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारातील अंतिम सामन्यांमध्ये भारताला दोन सुवर्णपदके मिळवून देण्यात मदत केली. सुजीतने पुरुषांच्या ६५ कि
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची १४ पदकांची कमाई


नवी दिल्ली, 12 एप्रिल, (हिं.स.) जागतिक अंडर-२३ चॅम्पियन सुजीत आणि अभिमन्यूने सीनियर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारातील अंतिम सामन्यांमध्ये भारताला दोन सुवर्णपदके मिळवून देण्यात मदत केली. सुजीतने पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील अंतिम सामना उझबेकिस्तानच्या उमिदजोन जलोलोव्हविरुद्ध ८-१ ने जिंकला आणि बजरंग पुनिया (२०१९) नंतर या वजन गटात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

पहिल्या फेरीत सुजीतची सुरुवात संथ झाली होती. कारण जलोलोव्हने आपली पकड कायम ठेवली आणि भारतीय कुस्तीपटूला हल्ला करण्याची संधीच दिली नाही. पण या २३ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीलाच वेग वाढवला आणि उझबेक कुस्तीपटूविरुद्ध आपला पाचवा विजय नोंदवला. काही मिनिटांनंतर, अभिमन्यूने भारतीय संघाचा आनंद द्विगुणित केला. पुरुषांच्या ७० किलो फ्रीस्टाइल अंतिम सामन्यात ०-२ ने पिछाडीवर असताना अभिमन्यूने उल्लेखनीय पुनरागमन करत मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिरचा ५-३ असा पराभव केला.

सीआयएसएफ केंद्रीय कुस्ती संघातील २४ वर्षीय पैलवान, हेड कॉन्स्टेबल अभिमन्यूने, किर्गिझस्तानच्या बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत ७० किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकून दल आणि देशाला गौरव मिळवून दिला. संदीप मानला भारतासाठी सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी होती, परंतु पुरुषांच्या ७९ किलो गटाच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तो १-२ ने पराभूत झाला.

यापूर्वी, अंकुशने जपानच्या फुगा सासाकीचा ८-२ असा पराभव करून पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक पटकावले. यासह, भारताच्या एकूण पदकतालिकेत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्य पदकांची भर पडली आहे. स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताला आणखी दोन सुवर्णपदके जिंकण्याची संधी मिळेल, कारण पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते अमन (पुरुष ६१ किलो फ्रीस्टाइल) आणि मुकुल दहिया (पुरुष ८६ किलो फ्रीस्टाइल) यांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande