आयपीएल 2026 : संजू सॅमसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईचा हंगामातील पहिला विजय
चेन्नई, 12 एप्रिल (हिं.स.) चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी पराभूत करून आयपीएल हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. यापूर्वी चेन्नईला बंगळुरु, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले होते. दिल्लीने आप
संजू सॅमसन


चेन्नई, 12 एप्रिल (हिं.स.) चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी पराभूत करून आयपीएल हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. यापूर्वी चेन्नईला बंगळुरु, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले होते. दिल्लीने आपला सलग दुसरा सामना गमावला. चेपॉक येथे झालेल्या सामन्यात, संजू सॅमसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईने २० षटकांत दोन विकेट्स गमावून २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित षटकांत केवळ १८९ धावा करता आल्या. चेन्नईकडून ट्रिस्टन स्टब्सने ६० धावांची खेळी केली.

सलग सहा आयपीएल पराभवांनंतर चेपॉकमधील चेन्नईचा हा पहिला विजय आहे. या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळलेल्या नऊ आयपीएल सामन्यांमधील चेन्नई सुपर किंग्सचा हा आठवा विजय आहे. दरम्यान, दिल्ली आयपीएलमध्ये ३१व्यांदा सर्वबाद झाली आहे. या विजयामुळे चेन्नई गुणतालिकेत एका स्थानाने पुढे जात नवव्या स्थानावर पोहोचली आहे, तर दिल्ली चौथ्या स्थानावर कायम आहे.

चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली. केएल राहुल आणि पथुम निस्संका यांनी ४.६ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. राहुल १० चेंडूंमध्ये १८ धावा करून बाद झाला. दरम्यान, निस्संकाने २४ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह ४१ धावा केल्या. पण समीर रिझवी फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही आणि सहा धावांवर बाद झाला. कर्णधार अक्षर पटेल गुर्जपनीत सिंगच्या गोलंदाजीवर केवळ एका धावेवर बाद झाला.

डेव्हिड मिलरही दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला, तो १४ चेंडूंमध्ये केवळ १७ धावाच करू शकला. आशुतोष शर्मा १० चेंडूंमध्ये १९ धावा केल्यानंतर नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने शानदार फलंदाजी करत ३८ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केली, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. आकिब चार धावांवर बाद झाला. अंशुल कंबोजने कुलदीप यादवला चार धावांवर बाद केले. जेमी ओव्हरटनने चेन्नई सुपर किंग्ससाठी शानदार गोलंदाजी करत आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १८ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोजने तीन विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, सीएसकेने २० षटकांत दोन विकेट्स गमावून २१२ धावा केल्या. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीची जोडी या हंगामात पहिल्यांदाच चांगल्या लयीत दिसली. त्यांनी ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या. ऋतुराज १८ चेंडूंचा सामना करून १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर सॅमसनला आयुष म्हात्रेच्या रूपात एक चांगला साथीदार मिळाला. या दोघांनी ६८ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आयुष ३६ चेंडूंमध्ये ५९ धावा करून रिटायर्ड आऊट झाला. दरम्यान, संजू सॅमसनने ५२ चेंडूंमध्ये आपले चौथे आयपीएल शतक पूर्ण केले. सॅमसनने १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५६ चेंडूंमध्ये ११५ धावांची नाबाद संस्मरणीय खेळी केली. शिवम दुबेने १० चेंडूंमध्ये नाबाद २० धावा केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande