
नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)आयपीएल २०२६ चा हंगाम भारताचा सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराहसाठी चांगला जात नाही. बुमराह आयपीएलमध्ये पूर्वीसारखा प्रभावी दिसत नाही. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने बुमराहच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले असले तरी, इतर फलंदाजांनीही त्याच्याविरुद्ध मोठे फटके मारण्याचे कौशल्य विकसित केले आहे. यामुळेच बुमराह धावा देत आहे, पण विकेट्ससाठी तो आतुर झालेला दिसतो.
मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने इंडियन प्रीमियर लीगवर वर्चस्व गाजवले होते, ज्यानंतर बुमराहनेही आपले नाव कमावले. पण आता फलंदाज इतके हुशार झाले आहेत की ते बुमराहविरुद्ध सहज खेळतात, धावा करतात आणि त्याला विकेट्स देत नाहीत. आरसीबीविरुद्ध विराट कोहली सुरुवातीला त्याच्याविरुद्ध सावधपणे खेळला, पण अखेरच्या षटकांमध्ये टिम डेव्हिडने त्याच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारला. परिणामी, बुमराहने चार षटकांत ३५ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
बुमराहबद्दल बोलायचं झालं तर, त्याला आयपीएलमध्ये विकेट घेऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्याची शेवटची विकेट गेल्या मोसमात आली होती. तेव्हापासून, सलग पाच सामन्यांमध्ये बुमराहला एकही विकेट घेता आलेली नाही. या काळात त्याला पंजाब, दिल्ली, केकेआर, राजस्थान आणि आता आरसीबीच्या फलंदाजांविरुद्ध कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. आकडेवारीनुसार, बुमराहने आतापर्यंत एकही विकेट न घेता १२२ चेंडू टाकले आहेत, जो त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात मोठा असा कालावधी आहे.
बुमराहची शेवटच्या 5 सामन्यांमधील कामगिरी:
०/४० (४ षटके) विरुद्ध पंजाब किंग्स, अहमदाबाद
०/३५ (४ षटके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, वानखेडे
०/२१ (४ षटके) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली
०/३२ (३ षटके) विरुद्ध राजस्थान रॉयल्स, गुवाहाटी
* ०/३५ (४ षटके) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, वानखेडे
आता, बुमराहने लवकरात लवकर पुनरागमन केले पाहिजे, अन्यथा त्याची अनुपस्थिती मुंबई इंडियन्ससाठी घातक ठरू शकते. आरसीबीनेही बुमराहला हुशारीने हाताळले आणि मुंबईविरुद्ध २४० धावांचा मोठा डोंगर उभा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे