धावपटू सावन बरवालची ऐतिहासिक कामगिरी
-शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षे जुना राष्ट्रीय मॅरेथॉन विक्रम मोडला-रॉटरडॅम मॅरेथॉनमध्ये २:११:५८ वेळेसह २० वे स्थान-पहिल्याच मॅरेथॉनमध्ये नव्या विक्रमाला गवसणी ॲमस्टरडॅम, 13 एप्रिल (हिं.स.)हिमाचल प्रदेशचा लांब पल्ल्याचा धावपटू सावन बरवालने र इतिहास रच
सावन बरवाल


-शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षे जुना राष्ट्रीय मॅरेथॉन विक्रम मोडला-रॉटरडॅम मॅरेथॉनमध्ये २:११:५८ वेळेसह २० वे स्थान-पहिल्याच मॅरेथॉनमध्ये नव्या विक्रमाला गवसणी

ॲमस्टरडॅम, 13 एप्रिल (हिं.स.)हिमाचल प्रदेशचा लांब पल्ल्याचा धावपटू सावन बरवालने र इतिहास रचला. त्याने नेदरलँड्समधील एनएन मॅरेथॉन रॉटरडॅम येथे ४८ वर्षांचा मॅरेथॉन राष्ट्रीय विक्रम मोडित काढला. भारतीय ॲथलेटिक्समधील हा सर्वात जुना विक्रम होता. बरवालने एलिट मॅरेथॉन शर्यतीत ४२.१९५ किमी अंतर २ तास ११ मिनिटे आणि ५८ सेकंदात पार करून २० वे स्थान पटकावले.

या कामगिरीसह, त्याने १९७८ मध्ये शिवनाथ सिंग यांनी प्रस्थापित केलेला २:१२ तासांचा पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. या शर्यतीतील दुसरा भारतीय धावपटू, गोपी थोनाकल, २:१३:१६ तासांची वेळ नोंदवून २३ व्या स्थानावर राहिला. बरवालची ही कामगिरी अधिकच उल्लेखनीय आहे कारण रॉटरडॅममधील ही शर्यत त्याची पहिलीच मॅरेथॉन होती. या स्पर्धेपूर्वी तो कोणत्याही अधिकृत मॅरेथॉन शर्यतीत धावला नव्हता.

जानेवारीमध्ये अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाल्यानंतर या हंगामातील ही त्याची दुसरी स्पर्धा होती. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदर नगरमधील एका गावचा रहिवासी असलेल्या २८ वर्षीय बरवालने अनेक वर्षे कठोर परिश्रम करून एक नामांकित लांब पल्ल्याचा धावपटू म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. बरवालने दिल्ली हाफ मॅरेथॉन आणि वर्ल्ड २५ कोलकाता रनमध्येही नियमितपणे भाग घेतला आहे. त्याने २०२४ मध्ये दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भारतीय एलिट धावपटूंमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande