अकोल्यात सिलेंडर स्फोटात घर जळून खाक
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.)। अकोला शहरातील पंचशील नगर भागातील बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गाडगे महाराज विद्यालय परिसरातील एका राहत्या घरात रात्रीच्यावेळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील सोफा, कपाट, कपडे आणि धान्यासह
Photo


अकोला, 15 एप्रिल (हिं.स.)। अकोला शहरातील पंचशील नगर भागातील बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गाडगे महाराज विद्यालय परिसरातील एका राहत्या घरात रात्रीच्यावेळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील सोफा, कपाट, कपडे आणि धान्यासह सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या, यामुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दल येईपर्यंत नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. यामुळे आग शेजारील घरांमध्ये पसरण्यापासून रोखली गेली आणि मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अकोला महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग इतकी भीषण होती की अग्निशामक दल पोहोचेपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून राख झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande