छ. संभाजीनगर - गीता भवनात नृत्य, कवितांचे सादरीकरण
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.)। स्फूर्ती महिला मंडळाच्या वतीने चैत्रगौरी पूजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण जाई गटातर्फे गीता भवन येथे करण्यात आले. सुरवातीला अध्यक्षा मीरा पत्की, उपाध्यक्षा ऊर्मिला मगर, गटप्रमुख सुषमा दोडमणी व
छ. संभाजीनगर - गीता भवनात नृत्य, कवितांचे सादरीकरण


छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.)। स्फूर्ती महिला मंडळाच्या वतीने चैत्रगौरी पूजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण जाई गटातर्फे गीता भवन येथे करण्यात आले. सुरवातीला अध्यक्षा मीरा पत्की, उपाध्यक्षा ऊर्मिला मगर, गटप्रमुख सुषमा दोडमणी व स्मिता गिरी यांनी श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून चैत्रगौरीची आरती केली. कार्यक्रमाची सुरवात सुषमा दोडमणी यांच्या गणेश श्लोक व रामस्तुतीने झाली.

रूपाली अग्रवाल यांनी सुमन सुगंधित व राजस्थानी गीतावर नृत्य सादर केले. निशा अग्रवाल यांनी देवीला पत्र लिहून स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. अलका अमृतकर यांनी संशय कल्लोळ हा एकपात्री प्रयोग सादर केला. निशा अग्रवाल व प्राची पाठक यांनी दारुड्यावर विनोदी नाट्यछटा सादर केली. स्मिता गिरी यांच्या स्वरचित भिंगरी कवितेचे वाचन स्मिता गिरी व ऊर्मिला मगर यांनी केले. अलका अमृतकर यांनी महाराष्ट्राची थोरवी या विषयावर आडनावांच्या माध्यमातून वर्णन केले. सुषमा दोडमणी व स्मिता गिरी यांनी सोलो गीत व लावणी सादर केली. ऊर्मिला मगर यांनी फाइव्ह स्टार कामवाली ही विनोदी नाटिका सादर केली. यावेळी स्मिता गिरी, सुषमा दोडमणी, अलका अमृतकर, सुनीता पिंपरीकर, मंजू कोरंगळेकर, सुरेखा सानप, प्राची पाठक, निशा अग्रवाल, रूपाली अग्रवाल, माधुरी नाईक, ऊर्मिला मगर, कल्पना जाधव आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मीना देशपांडे यांनी केले, तर सुषमा दोडमणी यांनी आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande