अक्कलकोट राजघराण्याकडून वटवृक्ष मंदिरात स्वामींना नैवेद्य अर्पण
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)। प्रथेप्रमाणे अक्कलकोट राजघराण्याकडून वटवृक्ष मंदिर येथे स्वामींना नैवेद्य अर्पण करण्यात आला. या धार्मिक विधीला भक्तिमय वातावरण लाभले होते.यावेळी क्षेत्र रामेश्वरम येथील श्रीविद्या साधक परमपूज्य श्री राधाकृष्ण गंगाधर दश
dsdf


सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।

प्रथेप्रमाणे अक्कलकोट राजघराण्याकडून वटवृक्ष मंदिर येथे स्वामींना नैवेद्य अर्पण करण्यात आला. या धार्मिक विधीला भक्तिमय वातावरण लाभले होते.यावेळी क्षेत्र रामेश्वरम येथील श्रीविद्या साधक परमपूज्य श्री राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे, राजघराण्याचे राजपुरोहित पवन गुरुजी तसेच वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे उपस्थित होते.अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे तिसरे संयुक्ताराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत अभिषेक व पूजा पार पडली. या सोहळ्याने उपस्थित भक्तांमध्ये श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande