विचारांची, मनाची स्वतंत्र्यताच खरी लोकशाही : सुधीर गव्हाणे
नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)। संकुचित आणि मर्यादित विचार विकृतीकरण करतात. फक्त आपले घर आणि आपली माणसे एवढ्यापुरता विचार करणे हे घातक असून, ते स्वार्थीपणाचे लक्षण आहे. लोकशाहीसाठी मनाचे खुजीकरण अधिक धोकादायक आहे. विचारांची आणि मनाची स्वतंत्र्यताच खर
विचारांची, मनाची स्वतंत्र्यताच खरी लोकशाही : सुधीर गव्हाणे


नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)।

संकुचित आणि मर्यादित विचार विकृतीकरण करतात. फक्त आपले घर आणि आपली माणसे एवढ्यापुरता विचार करणे हे घातक असून, ते स्वार्थीपणाचे लक्षण आहे. लोकशाहीसाठी मनाचे खुजीकरण अधिक धोकादायक आहे. विचारांची आणि मनाची स्वतंत्र्यताच खरी लोकशाही आहे, असे मत प्रा. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले. स्वामी

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील समारोप व बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. यावेळी कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, माजी उपसंचालिका सुनीता रोडगे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, अध्यासन समन्वयिका डॉ. सुनीता पाटील, माजी संचालक राजेंद्र गोणारकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande