लातूर - जिल्हाधिकाऱ्यांची सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.) - लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शिरूर ताजबंद येथील ''इंद्रायणी'' निवासस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. लातूर जिल्ह्याची प्रशासकीय सूत्रे हाती घेतल्यानंत
जिल्हाधिकारी


लातूर, 15 एप्रिल, (हिं.स.) - लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी शिरूर ताजबंद येथील 'इंद्रायणी' निवासस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. लातूर जिल्ह्याची प्रशासकीय सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. बास्टेवाड यांनी घेतलेली ही भेट औपचारिक असली, तरी यामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

यावेळी नामदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा स्नेहपूर्वक सत्कार केला आणि लातूर जिल्ह्यात प्रभावीपणे विकासात्मक कामे करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि विविध लोकोपयोगी योजनांच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला. याप्रसंगी अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरजभैय्या पाटील, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, सादिक शेख, भागवत गुट्टे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील या समन्वय भेटीमुळे जिल्ह्याच्या विकासकामांना नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande