पुण्यात  ‘SYMHEALTH 2026’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पुणे, 15 एप्रिल (हिं.स.) : पुण्यातील सॉम्बॉसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वतीने 17 व 18 एप्रिल 2026 रोजी ‘SYMHEALTH 2026’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “Embracing Smart Healthcare:
jfghjfg


पुणे, 15 एप्रिल (हिं.स.) : पुण्यातील सॉम्बॉसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वतीने 17 व 18 एप्रिल 2026 रोजी ‘SYMHEALTH 2026’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “Embracing Smart Healthcare: Predictive, Precision and Personalized Health Systems” या संकल्पनेवर आधारित ही परिषद विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये पार पडणार आहे.

आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरण या विषयांवर आधारित ‘SYMHEALTH’ परिषद यंदा 27व्या वर्षात पदार्पण करत असून देशातील अग्रगण्य शैक्षणिक परिषदांमध्ये तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या परिषदेत सुमारे 1,400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा असून, त्यामध्ये चिकित्सक, संशोधक, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, आयटी नवोन्मेषक तसेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

दोन दिवसीय परिषदेत प्रमुख व्याख्याने, पॅनल चर्चा, संशोधनपत्र सादरीकरणे आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांमधील संवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्मार्ट आरोग्यसेवेच्या माध्यमातून भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचा वेध घेण्यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande