नांदे - अर्धापूर येथील निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)। शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसेच डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेण्यात
नांदे - अर्धापूर येथील निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)।

शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसेच डॉ. शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेण्यात आली.

प्रभारी प्राचार्य डॉ. अजय टेंगसे यांच्या मार्गदर्शनात मराठी विभागप्रमुख डॉ. ल. ना. वाघमारे, डॉ. संगीता घुगे, डॉ. रंगनाथ नवघरे यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी 'सांविधानिक मूल्ये व वर्तमान स्थिती', 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मराठी भाषेचे स्थान', 'कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयोगिता व प्रकल्प अधिकारी डॉ. विलास ढवळे, परिणाम' हे तीन विषय दिले होते. स्पर्धेचे परीक्षण साहित्यिक, पत्रकार व माजी

डॉ. भारत कचरे यांनी केले. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, पाच हजार व सन्मानचिन्ह असे प्रथम पारितोषिक श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा येथील वैष्णवी विजय पवार हिने पटकावले. तीन हजार व सन्मानचिन्ह असे द्वितीय पारितोषिक अक्षता संतोष दहिफळे (कै. शंकरराव गुट्टे ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धर्मापुरी, जि. बीड) हिने मिळवले. तृतीय पारितोषिक (दोन हजार व सन्मानचिन्ह) प्रगती बालाजी टाकणखार (बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमतनगर, जि. हिंगोली), उत्तेजनार्थ पारितोषिक सलोनी साहेबराव जोंधळे (राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड, जि. नांदेड), नंदिनी बालाजी हामंद धर्माबाद) यांना मिळाले. सर्व विजेत्यांना लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande