
पुणे, 15 एप्रिल (हिं.स.)। पुणे येथील विद्या महामंडळाच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेत आयबीएम या संगणक क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनीने तयार केलेल्या आयबीएम सोअर- एआय टू बीअवेअर प्लस (IBM – SOAR “AI to be Aware+) या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (आर्टिफिशियलइंटेलिजन्स) प्रशिक्षण अभ्यासक्रम नुकताच संपन्न झाला.
प्रशालेचे प्राचार्य गौतम मगरे, पर्यवेक्षक अजित गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आयबीएम कंपनीने प्रमाणित केलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकाकडून विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP-2020) यशस्वी स्किल्स लिमिटेडच्या पुढाकाराने सदर उपक्रम राबविण्यातआला असून यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ( एमएनजीएल) कंपनीच्या सीएसआर निधी अंतर्गत सहकार्य उपलब्ध झाले, असे प्राचार्य गौतम मगरे यांनी सांगितले.
इयत्ता सातवी ते इयत्ता नववीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण उपक्रमात सहभाग नोंदवला असून याप्रशिक्षणात विद्यार्थ्यांना आर्टीफिशियल इंटेलिजन्सबाबत मूलभूत ज्ञान,भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांसाठी सज्ज होण्यासाठी एआय चा वापर तसेच डिजिटल जागरूकता आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळाले असे प्रशालेच्या स्टेम टिंकरिंग लॅबचे प्रमुख भगवान पांडेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु