नांदेड - रोशनगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नकाशावरील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)। रोशनगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नकाशावरील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल, भूमी अभिलेख व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून हा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा
नांदेड - रोशनगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नकाशावरील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी


नांदेड, 17 एप्रिल (हिं.स.)।

रोशनगाव येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नकाशावरील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महसूल, भूमी अभिलेख व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून हा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रशासनाने पुढाकार घेत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून शासनाचे नियम समजावून सांगितले

रोशनगाव येथील नकाशावरील रस्ता महसूल, भूमी अभिलेख व पोलिस प्रशासनाच्या कारवाईतून खुला करण्यात आला.

सामंजस्याने रस्ता खुला करून घेतला. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक लता पगलवाड, भूमी अभिलेख विभागाच्या शिल्पा गड्डुवार, तलाठी शेख, पोलिस कर्मचारी, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. रोशनगावातील इतर नकाशावरील रस्तेही खुले करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल, असे सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande