छ. संभाजीनगर - 'स्त्री जन्माचे स्वागत करा' कार्यशाळेतून समानतेचा संदेश
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल (हिं.स.)। महापालिका आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ''स्त्री जन्माचे स्वागत करा'' या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजनरी बोर्डाच्या सदस्य डॉ. सुधा
छ. संभाजीनगर - 'स्त्री जन्माचे स्वागत करा' कार्यशाळेतून समानतेचा संदेश


छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल (हिं.स.)। महापालिका आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्त्री जन्माचे स्वागत करा' या विषयावर जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजनरी बोर्डाच्या सदस्य डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले.

गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपाताविरोधात माहिती देणाऱ्यास शासनाकडून एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ / १०४ किंवा संकेतस्थळाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले.

महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे ही कार्यशाळा झाली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्यासह ग्रामीण रुग्णालय करमाडचे डॉ. मनोज डोंगलीकर, डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. अंजली पाथ्रीकर, डॉ. अमरज्योती शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्व आशा सेविकांनी समानतेची शपथ घेतली. फक्त मुली असलेल्या आशा सेविकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यशाळेत तज्ज्ञांनी विविध उदाहरणांद्वारे समाजातील लिंगभेदाच्या समस्यांवर प्रकाश टाकला आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. उपस्थित आशा सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. सहभागींच्या प्रश्नांना मार्गदर्शनपर उत्तरे देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande