छ. संभाजीनगर - जिल्हा बँकेसाठी तात्पुरती मतदार यादी सात दिवसांत
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ७०९ कृषी आणि ८४९ बिगरशेती सहकारी संस्थांकडून मतदान प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. यासाठी ठराव मागवले होते. आता प्राप्त ठरावांवरून तात्पुरती मतदार यादी
छ. संभाजीनगर - जिल्हा बँकेसाठी तात्पुरती मतदार यादी सात दिवसांत


छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ७०९ कृषी आणि ८४९ बिगरशेती सहकारी संस्थांकडून मतदान प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. यासाठी ठराव मागवले होते. आता प्राप्त ठरावांवरून तात्पुरती मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे नवीन संचालक

मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधून तालुकानिहाय प्रत्येकी एक याप्रमाणे ९ संचालक निवडले जाणार आहेत. बिगरशेती संस्थांमधूनही पाच संचालकांची निवड होणार आहे. दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, नागरी बँका, पतसंस्था व इतर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मतदान करतील. याशिवाय अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व महिला प्रतिनिधित्वासाठी राखीव जागाही असतील. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस निवडणूक होईल, असा अंदाज आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande