अचलपूर- परतवाडा प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका- प्यारे खान
नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर–परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. यात आतापर्यंत आढळलेल्या पि
अचलपूर- परतवाडा प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका- प्यारे खान


नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर–परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. यात आतापर्यंत आढळलेल्या पिडीता आणि आरोपी दोन्ही मुस्लिम धर्मिय आहेत. तेव्हा याला धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केले. प्यारे खान यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मुख्य आरोपीचे घर पाडणे तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याची मागणीही केली आहे. तथापि, या प्रकरणाला कोणताही धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. “हा गुन्हा मानवी संवेदनांना हादरा देणारा असून यावर कायद्याच्या चौकटीतून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अचलपूर येथून राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आयोगाची विशेष टीम उद्या अचलपूर आणि परतवाडा येथे भेट देऊन घटनास्थळी पाहणी आणि सखोल चौकशी करणार आहे. पीडितांची स्थिती, पोलिस तपासाची प्रगती आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका याचा आढावा घेतला जाणार आहे.पोलिसांनी आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू ठेवला असून आणखी पुरावे किंवा संबंधित व्हिडिओ समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande