
कोल्हापूर, 15 एप्रिल (हिं.स.) : नाशिक येथील टाटा कन्संटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीत हिंदू महिला कर्मचार्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
हा प्रकार नाशिकपुरता मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट जिहाद’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने निवेदनाच्या माध्यमांतून जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले. ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. एन्.सी.ई.आर.टी.च्या इयत्ती ८ वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यात यावा. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील ३०८ मदरशांना दिलेले ५० लाख रुपयांचे अनुदान त्वरित थांबवून राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाचे रक्षण करावे. या दोन मागण्यांही निवेदनातं देण्यात आल्या .
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar