
पुणे, 15 एप्रिल, (हिं.स.)। घाऊक बाजारात साखरेचे दर मंदीत आहेत, इथेनॉलला अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीची (एफआरपी) देय रक्कम शेतकऱ्यांना देण्यात अडचण येत असल्याबाबतचे गाऱ्हाण्यांचे गुऱ्हाळ उपस्थित कारखान्यांच्या प्रतिनिधींनी साखर संचालकांसमोर सुरुच ठेवल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत उर्वरित थकीत एफआरपीची रक्कम देऊ, असे रडगाण्याची भूमिका कारखान्यांनी घेतली असून, साखर आयुक्तालयाने या बाबतची पुढील सुनावणी आता 7 मे रोजी साखर संकुल येथे ठेवली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली शेतकऱ्यांना 29 कारखान्यांकडून देय असलेल्या एफआरपीची एकूण रक्कम 3074 कोटी 33 लाख रुपये होती. त्यापैकी कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2061 कोटी 89 लाख रुपये जमा केलेले आहेत. तर प्रत्यक्षात 1012 कोटी 44 लाख रुपये अद्यापही देणे बाकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु