‘नारी शक्ती वंदन’ विधेयक महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाचे: डॉ. अर्चना पाटील चाकूरकर
लातूर, 15 एप्रिल (हिं.स.) : संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच सत्तेतील त्यांची भागीदारी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष ड
नारीशक्ती


लातूर, 15 एप्रिल (हिं.स.) : संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी तसेच सत्तेतील त्यांची भागीदारी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. आज.

बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी सांगितले की, हे विधेयक पारित करण्यासाठी १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, या अधिवेशनात विधेयक मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

डॉ. चाकूरकर यांनी पुढे सांगितले की, संसद आणि विधानसभांमध्ये जागा वाढवून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय असून, पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील नारीशक्तीचा सन्मान केला आहे. या विधेयकाची अंमलबजावणी २०२९ पासून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या निर्णयाचे महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, या विधेयकाच्या पारित होण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गंजगोलाई ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क दरम्यान सर्वपक्षीय महिलांकडून अभिनंदन पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, नगरसेविका रागिणी यादव, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शीतल मालू, . मीना गायकवाड, जयश्री मोतीपवळे, जयश्री पाटील, अॅड. अस्मिता काटे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande