
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।लग्नसराईमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन, राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. १५ जून २०२६ या कालावधीत जिल्हयातील विविध आगारांतून तब्बल २६ नवीन जादा फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय बीड विभागाने घेतला आहे. यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.
बीड विभागागाच्या वेळापत्रकानुसार, बीड ते यवतमाळ, धारूर ते छत्रपती संभाजीनगर (४ फेऱ्या), धारूर ते सातारा, धारूर ते बोरीवली अशा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा यात समावेश आहे. याशिवाय पाटोदा ते लातूर, पाटोदा ते परभणी, अंबाजोगाई ते धुळे आणि माजलगाव ते धुळे या मार्गावरही नवीन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले
वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी या सर्व जादा फेऱ्यांच्या आरक्षणाची सोय महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच पसंती द्यावी, असे आवाहन केले आहे.
या २६ जादा फेऱ्यांव्यतिरिक्त बीड-परळी, बीड-लातूर, बीड-पुणे आणि गेवराई- पुणे यांसारख्या प्रमुख मार्गावरही प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेसची संख्या वाढवण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis